खडकीच्या दादासाहेब शिंगटे यांनी पाण्यासाठी स्वतःची जमीन दिली दुसऱ्या गावाला विनामोबदला .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
हल्लीच्या युगात बांधावरुन जीवावर सख्खे भाऊ एकमेकाच्या जीवावर उठल्याचे पहायला मिळतात. जमीनीच्या तुकड्यासाठी अखी हयात कोर्टात घालवलेले कुटुंबिय आपण पहातो. परंतु एका गावातला ग्रामस्थ दुसऱ्या गावासाठी आपली जमीन विना मोबदला जमीन बक्षीसपत्र देतो. असे चित्र क्वचितच पहायला मिळते. असा दुर्धर प्रकार वाई तालुक्यातील चांदवडी आणि खडकी येथे पहायला मिळत आहे. खडकीच्या दादासाहेब शिंगटे पाटील यांनी विना मोबदला चांदवडी गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी 0/2 गुंठे जागा ग्रामपंचायतीला देवू केली आहे.
सध्याचा जमाना खूप वेगळा आहे. जमीनीसाठी, प्रॉपर्टीसाठी एकमेकांना रक्ताच्या नात्यातले सोडत नाहीत. एकमेकांच्या जीवावर उठतात. अगदी फुटाची जागा सोडण्यासाठी सुद्धा भाऊ भावासाठी मागे घेत नसतो. अशा या काळात दानशुर व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतात. त्यापैकी वाई तालुक्यातील खडकीचे दादासाहेब तात्याबा शिंगटे पाटील हे एक. शिंगटे पाटील यांनी शेजारच्या चांदवडी या गावाच्या पिण्याच्या पाण्याच्या नवीन विहिरीसाठी जागा देवू केली आहे. विहिरीसाठी 0/2 गुंठे जागा त्यांनी दि. 4 एप्रिल रोजी विना मोबदला ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करुन दिली आहे. चांदवडी या गावच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसाठी जागा देण्यात आल्याने त्यांचे ग्रामपंचायतीच्यावतीने आभार मानले जात आहे.