२८ वर्षीय महिलेचा छळ केल्या प्रकरणी दोघांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल.
वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील एका गावातील सुषमा जाधव वय २८ या महिलेचा छळ केल्या प्रकरणी दोघांवर भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. मार्च २०२३ पासून आज ५/४/२४ रोजी पर्यंत युवराज जाधव व बाजीराव जाधव यांनी सुषमा जाधव फिर्यादी महिलेस घरातील कामे नीट येत नाहीत व कामे लवकर करत नाही. व्यवसाय करण्याकरिता माहेरून दोन लाख रुपये घेऊन ये तसेच फिर्यादी महिलेस मारहाण व शिवीगाळ केली म्हणून त्या दोघांच्या विरोधात भुईंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्यादी महिलेने तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास सपोफौ टकले करत आहेत.