विनापरवाना दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई.
नसरापूर : विनापरवाना दारू विक्री प्रकरणी एकावर राजगड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की
ADVERTISEMENT
शनिवार दि.23 रोजी 17: 30 वा. चे सुमारास मौजे कोंढणपुर ता. हवेली जि.पुणे गावचे हद्दित हॉटेल मेघराजचे पाठीमागे पत्रा शेडचे आडोशास इसम नामे निलेश नारायण शिंदे, वय 30 वर्षे, याने त्याचे कब्जात पांढरे रंगाचे पिशवीत 180 मिलीच्या मापाच्या एकुण 10 टॅगो पंच देशी दारूच्या बाटल्या अशा एकुण 700/- रूपयाचा प्रोव्हीशनचा माल बाळगुन त्याची ओळखीचे लोकांना विक्री करत असताना मिळुन आला म्हणून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली. याचा अधिक तपास पोना खेगंरे करत आहेत


