अवैध दारू विक्री प्रकरणी रांजे येथे एकावर कारवाई.
नसरापूर : अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर राजगड पोलिस स्टेशन मध्ये कारवाई करण्यात आली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,
ADVERTISEMENT
शनिवार दि.23 रोजी सांयकाळी 16/00 वाजताचे सुमारास मौजे रांजे ता भोर जि पुणे गावचे हददीत चितळे कंपनी पासुन थोडे अंतरावर एका झाडाचे खाली गंगाराम नथु गुजर याने आपले कब्जात बिगर परवाना देशी दारू टॅगो पंच नावाच्या दारूच्या 12 बाटल्या कि रु 840 चा माल जवळ बाळगून त्याची चोरून विक्री करताना मिळून आला आहे म्हणुन त्याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आले आहे याचा अधिक तपास स फौ चव्हाण करत आहेत.


