कामथडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू.


नसरापूर प्रतिनिधी :

भरधाव वेगात जाणाऱ्या एका वाहनाने अनोळखी महिलेला धडक दिली. त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि.23 रोजी रात्री 07:30 वाजण्याच्या सुमारास हॉटेल दख्खन पठाण समोर घडली. त्यानुसार केतन हनुमत शेटे वय 27 यांनी नसरापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात नसरापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामथडी ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत हॉटेल दख्खन पठार समोर पुणे सातारा हायवे रोडवर सातारा बाजू कडून पुणे बाजुकडे एक अनोळखी महिला वय अंदाजे 40 ते 42 रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहनाने वाहतुकीचे नियमाकडे दुर्लक्ष करून अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अपघाताची माहिती पोलिसांना न देता वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. महिलेची ओळख पटली नाही. म्हणून फिर्यादी यांनी नसरापूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

याचा अधिक तपास पो. स. इ. सुतनासे करीत आहेत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!