ओझर्डे येथे एकास मारहाण ; २ जणांवर गुन्हा दाखल .


 

वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

वाई : ओझर्डे येथे एकास मारहाण केल्या प्रकरणी २ जणांवर भुईंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. २२ रोजी १:३० वा. सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत वैभव जरे फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या बाहेर शिविगाळ दमदाटी करून फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने सागर गुजर व शोभा गुजर यांनी काहीही कारण नसताना फिर्यादीच्या घरात घुसून लाकडी काठीने मारहाण केली तसेच कुऱ्हाड मारण्यासाठी उगारली यामध्ये फिर्यादी जखमी झाला म्हणून त्या दोघांच्या विरोधात वैभव याने भुईंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास स.पो.फौ. टकले करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!