प्रा.लावंड यांच्या गुराखी कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा संपन्न.
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
वाई दि २३ :-ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलमथील प्रा. संभाजी लावंड यांच्या गुराखी या ग्रामीण कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुणे साहित्यिक व ज्येष्ठ समीक्षक प्रा डॉ रघुनाथ केंगार यांचे हस्ते व प्रा डॉ पंडीतराव टापरे यांच्या अध्यक्षतेखाली ,विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण,माजी उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर,माजी सचिव प्रा दत्तात्रय वाघचौरे,सचिव राहुल जगदाळे यांचे उपस्थितीत पार पडला. खातगुण येथील कवी व साहित्यिक श्री अरविंद यादव यांनी उपस्थित राहून गावच्या स्मृतींना चांगलाच उजाळा दिला.तर डॉ स्वप्नील तौर यांनी गुराखी पुस्तकाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले नंतर मान्यवरांचा सत्कार करणेत आला. संस्थेच्या वतीने लेखक लावंड परिवाराचे शाल श्रीफल देवुन उचित सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गुराखी या पुस्तकांचे प्रकाशन करणेत आले. प्राचार्या शुभांगी पवार म्हणाल्या वाचन चिंतनाचे व्यक्तीला लेखन कला प्राप्त होते. या लेखनास पुरक असे वाताव रण व निसर्गाचे वरदान ज्ञानदीपला लाभले आहे. याचा फायदा सर्वांनी द्यावा. प्रा. डॉ.रघुनाथ केंगार सरांनी गुराखी या पुस्तकाचे अंतर्बाह्य परीक्षण करुन लेखक व त्यांची चिंतनशीलता किती प्रभावी असू शकते याचा प्रत्यय म्हणजे गुराखी कथासंग्रह आहे. असे गौर वोद्गार काढले. तर डॉ.पंडित टापरे सरांनी आपल्या भाषणातून गुराखी या पुस्तकातील बलस्थाने व भाषा शैलीचा मागोवा घेतला., या प्रसंगी सौ एकता लावंड, शिक्षिका सौ. लता जाधव ,सौ सरस्वती वाशिवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . प्रा. पोपटराव काटकर यांनी सुत्रसंचलन व आभार मानले. कार्यक्रमाला संजय डेरे,दत्ता महागडे,मयुर एरंडे, खातगुण गावचे मान्यवर ग्रामस्थ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


