रोहित्र फोडून 40 हजार कॉपरची चोरी : शिंदेवाडी ता.भोर येथील घटना.
भोर : शिंदेवाडी ता. भोर येथे 40000 हजार तांब्याच्या कॉईलची चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.22/3/24 रोजी 00:00 वा. ते सकाळी 09:00 वा. सुमारास शिंदेवाडी ता. भोर जिल्हा पुणे गावच्या हद्दीतील जुन्या कात्रज बोगद्याच्या डोंगरावरील डीपी कोड डी टी सी 4058680 असा असलेला महावितरण कंपनीची 63 के व्ही ए क्षमतेचा ट्रांसफार्मर मधील तांब्याच्या 80 किलो वजनाच्या किंमत अंदाजे 40000 रुपये किमतीच्या कॉइल खाली पाडून त्यामधील ऑइल सांडून नुकसान केल्याने त्या अज्ञात चोरट्या विरोधात दि 24 रोजी राजेंद्र खरात यांनी नसरापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास प्रभारी अधिकारी राजेश गवळी व स फौ चव्हाण करीत आहेत


