खंडाळा तालुक्यातील जवळे गावात घरफोडी! ५६ हजाराचा मुद्देमाल लंपास.


उपसंपादक : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

जवळे, ता. खंडाळा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी खंडाळा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महेश प्रकाश भोसले, वय २३, रा. जवळे, ता. खंडाळा यांच्या पटी नावाच्या शिवारातील बंद घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून एक दुचाकी, पाणी तापविण्याचा तांब्याचा बंब तसेच विवो कंपनीचा मोबाईल असा सुमारे ५६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. याप्रकरणी महेश भोसले यांनी त्या अज्ञाताविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली असुन याचा अधिक तपास पोलीस हवालदार बाबुराव वरे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!