राजापूर पांडे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमनपदी आणि व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड.


मुख्य संपादक : मंगेश पवार

सारोळे : भोर तालुक्यातील राजापूर पांडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन गणपत पिसाळ यांचा कार्यकाळ संपल्याने महेश साळुंके यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांची चेअरमन पदी तर व्हॉइस चेअरमन पदी बाळू यादव यांची बिनविरोध निवड करण्यात.

भोर तालुक्यातील राजापूर पांडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या सोमवार दि. २२ रोजी झालेल्या निवडीत महेश साळुंके यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हॉइस चेअरमन पदी बाळू यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवणुक संजय पवार आणि ऋषीकेश बोबडे सेक्रेटरी यांच्या देखरेखीखाली निवडणूक कामकाज पार पडली. ही सोसायटी गेल्या ६३ वर्षापासून कार्यरत आहे. पूर्व भागातील सर्वात जुनी सोसायटी आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लवकरात लवकर कर्ज देतात.नवनियुक्त चेअरमन महेश साळुंके हे युवा तरुण आहेत.

ADVERTISEMENT

निवडीबद्दल पांडे गावचे युवा तरुण सरपंच तेजस साळुंके यांनी नवनियुक्त चेअरमन आणि व्हा. चेअरमन यांचा सत्कार केला. यावेळी पांडे ग्रामपंचायत ग्रामसेविका नीलेश्री यादव, सुहास साळुंके, बाळू यादव, शंकर साळुंके, किरण साळुंके, नारायण साळुंके, बाळू खुटवड, ज्ञानेश्वर बोबडे, राजापूर सरपंचबाळासाहेब बोबडे,अर्जुन बोबडे,
विलास कांबळे, मथुरा साळुंके, सतीश साळुंके, मनिष साळुंके उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!