शिरगाव येथील १७ वर्षाच्या मुलाचा विषारी औषध कोल्ड्रीक्समध्ये टाकून पिल्याने मृत्यू भुईंज पोलीस ठाण्यात नोंद.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील शिरगाव येथे दि.७ मे रोजी सायंकाळी यश नामदेव धुमाळ वय १७ याने घरातच तांदळात टाकण्याचे विषारी औषध कोल्ड्रीक्समध्ये टाकून पिले. त्याचा त्रास होवू लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्याचा उपचार सुरु असताना दि. ७ मे रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता मृत्यू झाला. याची खबर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुपेकर यांनी भुईज पोलिसांना दि.10 मे रोजी दुपारी 1.30 वाजता दिली. याचा तपास एएसआय टकले हे करत आहेत.


