कुस्तीपटू तरुणीवर कुस्ती क्षेत्रात भविष्य घडवून देण्याच्या आमिषापोटी केलें लैगिक अत्याचार.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
भोर : आजही समाजात गुरुकडे आदराने पाहिले जाते मात्र गुरु व शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना भोर येथे घडली असून गुरुनेच शिष्याला कुस्तीमध्ये करिअर घडविण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून २१ वर्षीय कुस्तीपटू तरुणीचा वेळोवेळी जबरदस्तीने विनयभंग करत लैंगिक शोषण केल्या प्रकरणी संबंधित तरुणीने शुक्रवार (दि. २९) रोजी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने भोर मधील नामांकित कुस्तीसंकुलाच्या संचालक तथा प्रशिक्षक यास भोर पोलिसांनी अटक केली आहे.
सुनिल विठ्ठल शेटे (वय ५३ रा. संजयनगर भोर) असे अटक केलेल्या कुस्ती प्रशिक्षकाचे नाव असून त्याने मागील चार महिन्यामध्ये २१ वर्षीय महीला कुस्तीपटूस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवलेमधील एका नामांकित कुस्ती संकुलाचा संचालक तथा प्रशिक्षक असणाऱ्या सुनिल शेटे याने कुस्तीपटू तरुणीला लग्नाचे व कुस्तीमध्ये करिअर घडविण्याचे आमिष दाखवून डिसेंबर २३ ते मार्च २४ या दरम्यान महाबळेश्वर येथील हॉटेल रेनफॉरेस्ट व सातारा जिल्हा जवळील परिसरातील लॉजवर चारचाकी मोटारीतून घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले तसेच सदर प्रकार कोणास सांगितलास तर तुझे करिअर बरबाद होईल अशी धमकी दिली याशिवाय मोटारीतून कुस्ती संकुलात घेऊन येताना वेळोवेळी तिचा विनयभंग केला आहे अशा आशयाची फिर्याद पिडीत तरूणीने दिली असल्याने भोर पोलिसांनी आरोपी सुनिल शेटे यास शुक्रवारी सायंकाळी अटक केली आहे.
पुढील तपास भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिला खोत करीत आहेत.


