पाटण येथे महाविकास आघाडीचा संवाद मेळावा.


पाटण प्रतिनिधी :शंकर माने

पाटण येथील महाविकास आघाडीचा संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चे माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर(दादा), श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस हिंदुराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उ.बा.ठाकरे सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम ,

ADVERTISEMENT

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे व राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष सुरेश जाधव या मान्यवरांनी उपस्थितीत राहून मार्गदर्शन केले.

तसेच यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प.सदस्य, आजी/माजी पं.स.सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, आजी/माजी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व मित्रपक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!