शिंदेवाडी येथून अज्ञात चोरट्याने दुपारी मोटरसायकल चोरली.


शिंदेवाडी प्रतिनिधी : भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावर असलेल्या शिंदेवाडी गावाच्या हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदेवाडी येथे दि.23/3/24 रोजी दुपारी 14.30 ते 17 :00 वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत आईसाहेब हॉटेलच्या जवळ पुणे ते सातारा रोडवर रस्त्याच्या कडेला हँडल लॉक केलेली होंडा कंपनीची शाईन काळ्या रंगाची 30000 रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम. एच.25 ए. ई.0475 ही गाडी अज्ञात चोरट्याने लंपास केली. म्हणून फिर्यादी भागवत कोळपे यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पो. हवा गायकवाड करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!