पुण्यात वाहन चोरटे अखेर हडपसर पोलिसांच्या जाळ्यात, 11 दुचाकी 11,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, हडपसर पोलीसांची कामगिरी..!!


पुणे शहरांत सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण चांगलेच वाढले असून. मात्र पुणे शहर पोलीसही चांगलेच सतर्क असल्याचे पाहायला मिळत आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि शहरांतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून दुचाकी चोरी करणाऱ्या तीन आरोपींच्या हडपसर पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून जवळपास 11 चोरीचे गुन्हे उघड किसान 12 लाख तीस हजाराच्या 11 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अमन उर्फ परश्या भोला तिवारी वय 19 रा. माळवाडी हडपसर) मोहम्मद अशरफअली इम्तियाजअली अजमेरी (वय 20 ) रा. खराडी) प्रणव गणेश जमादार ( वय 20 )रा. माळवाडी वडगांवशेरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार रंजनकुमार शर्मा सहा पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उपाय आयुक्त परिमंडळ -5 अनुराधा उदमले मॅडम सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले अश्विनी जगताप (गुन्हे पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकांचे प्रभारी पोलीस निलेश जगदाळे उपनिरीक्षक हसन मुलांनी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे सतीश जाधव अमित साखरे आदीं पोलिसांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!