ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या ९ व्या स्नेहसंमेलनात म्हणजेच यशवंत महोत्सवात दिसली महाराष्ट्राची संस्कृती. 


मंगेश पवार

पुण्यभूमी न्यूज नेटवर्क

दि.11सारोळे :- ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी, ता.भोर,जि.पुणे यांचा ९ वा. स्नेहसंमेलन कार्यक्रम शुक्रवार ७ फेब्रुवारी व शनिवार ८ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. स्नेहसंमेलन म्हटले की मुलांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण येते. कला, सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञानाचे प्रयोग, खेळ अशा अंगभूत प्रतिभेला यानिमित्ताने बहर येतो. शाळेच्या आवारात तालासुरांची गट्टी जमली होती. नर्सरी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी गीतांवर थिरकत होते. अनेक मंजुळ गाण्यांचे सुर ऐकायला येत होते. स्नेहसंमेलनाच्या या जोरदार तयारीमुळे बाल कलाकार वेगळ्याच विश्वात रममाण झाले होते.

शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात आपल्यामध्ये असलेल्या सुप्त कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळावी व चिमुकल्यांना आनंद घेता यावा यासाठी भोर तालुक्यातील किकवी येथील ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा घेण्यात आला. या स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली.

स्नेहसंमेलन दोन दिवस उत्साहात पार पडला. त्यामध्ये प्रमुख उपस्थिती  शंकर हिरामण मांडेकर. (आमदार -भोर -राजगड) चंद्रकांत निवृत्ती बाठे (अध्यक्ष कबड्डी असोसिएशन भोर), सुनिता चंद्रकांत बाठे, मा. राजकुमार बामणे सर(BOD भोर गटशिक्षण अधिकारी जिल्हा ,भोर ) सुनील खळदकर ( ACP पुणे Retd), मानसी सुनील खळदकर, भालचंद्र जगताप (PDCC बँक संचालक,मा. अध्यक्ष राष्ट्रवादी), प्रवीण कुंभार (सरपंच पिरंगुट) निलेश मांडेकर(सरपंच चांदे)

ADVERTISEMENT

ऋषभ कंधारे,अक्षय जांभुळकर, योगेश ढमाले, नामदेव धोत्रे, उदय शिंदे, शिवाजीराव कोंडे (संचालक राजगड कारखाना), सोमनाथ सोमाणे(संचालक खरेदी विक्री संघ भोर) राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी किसान बैल अध्यक्ष), अजित सोनवणे (माजी सरपंच न्हावी- १५) कर्नल यशवंतराव रेणुसे (चेअरमन ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी),भारती यशवंतराव रेणुसे.

आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा श्री गणेश गीताने करण्यात आली. तर देशभक्तीपर गीताने वातावरण भारावून गेले होते, आईचा गोंधळ, हे पारंपारिक नृत्य, लोकनृत्य, शेतकरी गीताला चांगला प्रतिसाद मिळत होता. यावर्षीचा यशवंत महोत्सव एक वेगळी उंची गाठणारा ठरला.

सामाजिक संदेश देणाऱ्या थीम आणि विद्यार्थ्यांचे अप्रतिम सादरीकरण, यासाठी शिक्षकांनी घेतलेले कष्ट दिसत होते.

अघोरी-महाकाली नृत्य सादर करताना मुलांमधील आत्मविश्वास वाखाण्याजोगा होता.

राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, रमाई आंबेडकर, संत गोरा कुंभार या महापुरुषांच्या जीवनावरील सादरीकरण अफलातून होते.

विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा या कार्यक्रमात सहभाग देऊन एक नवीन चांगला आदर्श ठेवला गेला.

नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्याकडून

नृत्य करून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देणारा असा कार्यक्रम अप्रतिम झाला.

उपस्थित मान्यवरांनी मुलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन कर्नल यशवंतराव बंडू रेणूसे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य, उमेश बन्सीलाल सोनावले व स्कूलच्या समन्वयिका  जानवी उमेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन खूप मोठ्या जल्लोषात व आनंदी वातावरणात पार पडले. स्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!