हातवे बुद्रुक येथील कॅन्सर पेशंट साठी विक्रम खुटवड, डॉ.मंदार माळी यांची मोलाची मदत.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क.
दि. 9 भोर तालुक्यातील हातवे बुद्रुक या गावातील विलास पर्वती थिटे या ज्येष्ठ नागरिकाला साधारणता चार महिन्यापूर्वी कॅन्सर या आजाराने ग्रासले होते चार महिन्यांपूर्वी गावातील काही लोकांनी यांना आर्थिक मदत करून ससून या ठिकाणी ऑपरेशन साठी ऍडमिट केले पण त्यावेळेस काय ते ऑपरेशन त्यांना करता आले नाही,आर्थिक मदत करण्यामध्ये विकास जाधव, संजय जुगदर,सरपंच संदेश खराडे यांनी त्यांना आर्थिक मदत केली, त्यावेळेस त्यांना ऑपरेशन न केल्यामुळे ते पुन्हा आपल्या मूळ गावी म्हणजे हातवे बुद्रुक या ठिकाणी आले पण दिवसेंदिवस त्यांची तब्येत खूप खालावत चालली होती.याचा विचार करून भोर तालुक्याचे मा. जि. परिषद सदस्य विक्रम खुटवड यांना सर्व बाब सांगितली असता त्यांनी डॉक्टर आनंद साबणे यांच्याशी डॉक्टर मंदार माळी यांचेे लाईन वरती बोलणं करून दिलं यानंतर नसरापूरच्या आरोग्य केंद्रात यांना ऍडमिट केले असता त्यांनी रेफर बुक डॉक्टर मंदार माळी यांच्याकडे दिले. त्यानंतर 108 चे डॉक्टर मंदार माळी हे पेशंटला घेऊन ससून हॉस्पिटल या ठिकाणी गेले.ऍडमिट करण्यासाठी लागणारी ही सर्व प्रोसेस डॉक्टर मंदार माळी व गाडीचे ड्रायव्हर विशाल कदम व संदेश खराडे व अरुण भिलारे यांनी केली व त्यांना सुखरूप असे ॲडमिट केले.
त्यासाठी व १०८ ही अत्यावश्यक सेवा ही खरच गरजू लोकांसाठी व आपत्कालीन लोकांसाठी खूप महत्वाची हे समजले त्यासाठी इमरजेंसी मेडिकल ऑफिसर डॉ मंदार माळी तसेच पायलट विशाल कदम व पुणे झिस्ट्रिक्ट मैनेजर डॉ जावळे तसेच झोनल मैनेजर डॉ बोडके व एडीएम सुजित पाटील तसेच संतोष येनपुरे व नाना ओव्हाळ यांचे व बीव्हीजी १०८ टीमचे धन्यवाद मानले..


