भोंगवली येथे बुद्धिबळ स्पर्धेचे जंगी आयोजन…
पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज
कार्यकारी संपादक: सागर खुडे
७८व्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत १५ऑगस्ट२०२४ रोजी ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर भोंगवली येथील भाजप पक्ष भोंगवली शाखाप्रमुख वसंतराव परबळ, तसेच जिल्हा परीषद भोंगवली गण अध्यक्ष राजेंद्र निगडे या दोघांतर्फे बुद्धिबळ स्पर्धेचें आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी बऱ्याच बुद्धीजीवी आणि बुद्धिबळ प्रेमींनी आपला सहभाग नोंदविला.
ही स्पर्धा मोठा गट आणि लहान गट अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवन कोंडे यांनी देखील आपले कौशल्य आजमावले.
या स्पर्धेसाठी मोठ्या गटातील विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे ५००१ रकमेचे आदर्श जिल्हा परीषद सदस्य.चंद्रकांत बाठे यांसकडून देण्यात आले होते,तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ३००१रकमेचे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य.जीवन कोंडे यांसतर्फे देण्यात आले होते.
तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २००१रकमेचे संघटक-अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर अमर निगडे यांसकडून देण्यात आले होते.
त्याचप्रमाणे लहान गटातील(१६वर्षाखालील)विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक २००१रकमेचे भोर तालुका भाजपा उपाध्यक्ष.रमेश कंक यांसकडून देण्यात आले होते, तसेच व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक १५०१ रकमेचे शिवसेना उपाध्यक्ष पुणे जिल्हा गणेश निगडे यांसकडून आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक १००१रकमेचे भोंगवली गावचे विद्यमान सरपंच अरुण पवार यांसह सर्व इच्छूकांकडून देण्यात आली होती.
या बुद्धीच्या बळावर खेळल्या जाणाऱ्या खेळामध्ये मोठ्या गटामध्ये(१६वर्षावरील)प्रथम क्रमांक अभय वणवे, व्दितीय क्रमांक दिपक चव्हाण, तृतीय क्रमांक गणेश जाधव आला. त्याचप्रमाणे लहान गटामध्ये देखील (१६वर्षाखालील) आपल्या कौशल्याची पराकाष्ठा करून विजयश्री खेचून आणला असून त्यामध्ये प्रथम क्रमांक पार्थ निगडे, व्दितीय क्रमांक शुंभम जगताप, तृतीय क्रमांक साहिल मोहिते याचा आला आहे.
बक्षीस वितरण प्रसंगी जीवन कोंडे, चंद्रकांत बाठे यांच्या उपस्थित पार पडला,आणि मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
प्रसंगी सर्व आयोजक कमिटी, संतोष मोहिते आणि मान्यवरांसह ग्रामस्थ देखील उपस्थित होते.