मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभार्थी सन्मान सोहळा मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे संपन्न.
सातारा प्रतिनिधी : शंकर माने
सरकार महिला सशक्तीकरण आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध!
सातारा : दि. १८ मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभार्थी सन्मान सोहळा आज सातारा येथे मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब त्यांच्यासमवेत उपस्थित राहिले.

याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे काम सातारा जिल्ह्यात १ जुलैपासून सुरू झाले. पहिल्या पाच दिवसांत बहुतांश सर्व अर्ज भरले गेले. घरोघरी, शेता-बांधांवर, कामाच्या ठिकाणी जाऊन महिला भगिनींकडून अर्ज भरून घेण्याची संकल्पना सातारा जिल्ह्याने सुरू केली. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योजनेच्या कामाला जिल्ह्यात गती दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या सर्वांनी याकरिता खूप मेहनत घेतली. याबद्दल मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी जिल्हा प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले. तसेच मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी उपस्थित महिला भगिनींना यावेळी रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण गोड करण्याचे काम या योजनेमुळे झाले आहे, याविषयी त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महिला सशक्तीकरण आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केला.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री मा. आदितीताई तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष मा. नरेंद्रजी पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मा. महेशजी शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. मकरंदजी पाटील, मा. जयकुमारजी गोरे, मा. दीपकजी चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी-कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या विविध भागांतून ५० हजारांहून अधिक महिला भगिनी उपस्थित होत्या.


