पावसाळ्यात लाईट गेल्यानंतर प्रकाशदूत (लाईनमन) जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी असतात नेहमीच सज्ज,त्यांच्या व्यथा नारिकांनी समजून घेण्याची ते सुद्धा खंत करतात व्यक्त…


दि.25 सारोळे :- पावसाळा सुरु होताच विजेच्या लपंडावाला सुरुवात होते. यावर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे झाडं पडणे, विजेच्या तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणे अशा घटना घडताना आपण पाहतो,आणि त्याचा परिणाम थेट वीजपुरवठ्यावर होतो. अशा संकटमय परिस्थितीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकाशदूत अर्थातच लाईनमन,वायरमन आपल्या जीवाची कसलीही पर्वा न करता नागरिकांना वीजपुरवठा अखंडित मिळावा,त्यांना वीजपुरवठा सेवा शक्य होईल तितक्या वेळात सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतात.

 

कधी खोल चिखलात,कधी मुसळधार पावसात,तर कधी रात्री अपरात्री उंच खांबांवर चढून हे कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत असतात. पुरेशी सुरक्षा साधनं नसतानाही, फक्त लोकांची अडचण दूर व्हावी या वैचारीक दृष्टीचा हेतू उराशी बाळगून हे लाईनमन,वायरमन स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतात.नागरिकांनी देखील या काळात संयम बाळगावा,त्यांना थोडा वेळ द्यावा व गरज भासल्यास महावितरणच्या अधिकृत हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सर्व नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

 

ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला म्हणजे पुन्हा सुरु करणे कर्मचाऱ्यांपुढ एक मोठे आव्हानच असते.वीज पुरवठा खंडीत झाल्यावर महावितरण कंपनीचे लाईनमन,वायरमन यांचा शोध सुरु होतो.महावितरणच्या कार्यालयात नागरिकांकडून वारंवार फोन केले जातात.ज्या गावात जो लाईनमन,वायरमेन नेमला आहे,त्याला फोनवर फोन केले जातात,त्यानंतर अनेकदा वीज खांबावर असल्याने फोन उचलता येत नाही, त्यावरून त्याची तक्रार करण्यात येते. परिणामी कामात अडथळा येऊन ग्रामीण भागातील जनतेला तासनतास अंधारात राहण्याची वेळ येते.काही ठिकाणी एका एका लाईनमन, वायरमनला ३गावे अशी प्रत्येकी नेमून दिल्याने वेळेअभावी प्रत्येक ठिकाणी हजर राहता येत नसल्यामुळे त्यांना समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे,तरी काही गावात इलेक्ट्रीकचे काम करणारे इतर नागरिकांकडून अशी किरकोळ दुरुस्तीची कामे केली जातात.

 

“आम्हाला माहित आहे की हा धोका आहे, पण लोकांचा वीजपुरवठा सुरळीत करून देणे हे आमचं कर्तव्य आहे!” असे अभियंता शिवानंद पटणशेट्टी यांनी सांगितलं. अनेकदा त्यांना पुरेशा साधनांची व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असतानाही, ते अपार मेहनतीने काम करत आहेत.गरज आहे ती त्यांना समजून घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याची,कारण जस आपल्या सर्वांच कुटुंब असत, तस त्याचंदेखील कुटुंब आहे,त्यामुळं ओघवत्या काळानुसार नागरिकांना देखील त्याबद्दल विचार बदलणे गरजेचं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!