मस्करवाडी येथे संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा (बीज) उत्साहात संपन्न.
सातारा पाटण प्रतिनिधी: महेश मस्कर
पाटण तालुक्यातील मस्करवाडी नं२ येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठगमन सोहळा अगदी उत्साहात पार पडला.गेले अनेक वर्षापासुन सुरु असलेला संत शिरोमनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन (बीज)सोहळ्याचे आयोजन मस्करवाडी गावचे जेष्ठ नागरिक श्री बाळु रामचंद्र मस्कर हे करत असतात.यावर्षी देखील श्री बाळु रामचंद्र मस्कर यांच्या नेतुत्वाखाली ह.भ.प आप्पा महाराज मस्कर व त्याचे सर्व कुटुंबीय यांनी मोठ्या उत्साहात तुकाराम बीजे च्या कार्यक्रमाचे आयोजन केले.

या संपु्र्ण कार्यक्रमाची रूपरेषा मंगळवार दि २६/३/२०२४ रोजी जागराचे कीर्तन ह.भ.प विजय महाराज रामिष्टे आणि बुधवार दिनांक २७/३/२०२४ रोजी ह.भ.प बाबुराव महाराज भोसले यांचे फुलाचे कीर्तन झाले.तसेच ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था रामिष्टेवाडी,शाम महाराज,आप्पा महाराज शेडगेवाडी,पाटीलवाडी,घराळवाडी परीसरातील भजनी मंडळ यांनी सोहळ्याची साथ केली.या सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले सर्व गावकरी,भजनी मंडळ,वारकरी श्रोते मंडळी आणि परीसरातील भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम अशी सोय करण्यात आली.अशी या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.अत्यंत भव्यदिव्य व दिमाखदार आणि रंगतदार असा संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा संपन्न पार पडला.


