भोर विधानसभेच्या विकासासाठी बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार सौ.सुनेत्रा अजितदादा पवार यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या : शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश निगडे.
सारोळे प्रतिनिधी :
भोंगवली ता.भोर जि. पुणे येथील मारुती मंदिर या श्रद्धास्थानी, बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार यांचा गावभेट दौरा पार पडला.
या दौऱ्यात महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनिशी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षात महायुतीच्या माध्यमातून केंद्र व राज्य पातळीवर पार पडलेल्या विकासकामांबाबत समाजात लोकजागृती घडवून आणावी,तसेच महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जनतेच्या हितासाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहचवा अशा सूचना शिवसेना उपजिल्हाप्रमुख यांनी दिल्या.तसेच सौ सुनेत्रावहिनी यांचे बारामती हाय टेक पार्क, विद्या प्रतिष्ठान आणि भारतीय पर्यावरण मंच बारामती एनजीओ या माध्यमातून वहिनींचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे त्यामुळे अशा दूरदृष्टी असलेल्या वहिनी बारामती मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या तर भोर वेल्हा मुळशी तालुक्यात विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुनेत्रा वहिनींना भरघोस मताधिक्याने निवडून दया असे आवाहन केले.

यावेळी महायुतीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे,विक्रम खुटवड, रणजित शिवतारे,संतोष घोरपडे, भाजपचे नेते बाळासाहेब गरुड,जिवन कोंडे, राजेंद्र निगडे,शिवसेना नेते अमोल पांगारे, भोंगवली गावचे सरपंच अरुण पवार,तसेच दादा चव्हाण,मामू भांडे,प्रकाश शेडगे, प्रविण सुर्वे महादेव शेडगे,मयुर चव्हाण,आणि मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



