वाई वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. रविंद्र भाेसले यांची बिनविराेध निवड
वाई प्रतिनिधी: आशिष चव्हाण
वाई, दि. ९ : येथील वाई वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. रविंद्र भाेसले यांची बिनविरोध निवड झाली.
वाई वकील संघाची २०२३-२४ साठीची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. सर्व सदस्यांनी ही निवडणुक बिनविरोध करण्याचा मानस केला हाेता. त्यामुळे बिनविराेध झालेल्या या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. रविंद्र भाेसले तर उपाध्याक्षपदी ॲड. भारती काेरवार यांची बिनविरोध निवड झाली. तसेच सचिवपदी ॲड. अक्षय भाडळकर, सह सचिव पदी ॲड. चारुशिला गिमवेकर व खजिनदार पदी ॲड. विठ्ठल कदम व सदस्य पदी ॲड. अविनाश गजरे, ॲड. ऋुषिकेश कुंभार, ॲड. गणेश माेरे, ॲड. स्मिता जाधव, ॲड. उर्मिला पाटील यांची बिनविराेध निवड करण्यात आली.
या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ॲड. साहेबराव बामणे यांनी काम पाहिले.
नवनियुक्त पदाधिकार्यांचे ॲड. रमेश यादव, ॲड. संजय खडसरे, ॲड. राजेंद्र लाेखंडे, ॲड. उमेश सणस, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. महेश शिंदे, ॲड. सागर माेरे, ॲड. सुमन जाईकर, ॲड. मृण्मयी महांगडे, ॲड. मिलिंद देशपांडे, ॲड. जयंत गायकवाड, ॲड. साहेबराव बामणे, ॲड. प्रतापराव शिंदे, ॲड. शशिकांत हेरकळ तसेच सर्व सदस्य तसेच विविध स्तरातुन अभिनंदन करण्यात आले.


