पी एम श्री लोणंद मुले नं.२ शाळेत मुकुंद बेकार्ट वायर कंपनीमार्फत मेडीकल चेकअप कॅप संपन्न
संपादक दिलीप वाघमारे
पी एम श्री जि प प्राथमिक शाळा लोणंद मुले नं २ या शाळेत आज बेकार्ट मुकुंद वायर इंडस्ट्रीज कंपनी लि. लोणंद व फिजिकल कार्पोरेट वेलफेअर प्रा.लि. पुणे या संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुले व अंगणवाडीतील लहान मुलांचे संपूर्ण शरीराचे चेकअप करण्यात आले. त्यासाठी पुणे येथील १५ तज्ञ डाॅक्टरांची टीम अतीशय अत्याधुनिक साधन सामुग्रीसह संपूर्ण दिवसभर शाळेत उपस्थित राहून मुलांचे दात डोळे बाॅडी मास इंडेक्स यासह विविध प्रकारच्या तपासणी केल्या. यावेळी आमचे मार्गदर्शक खंडाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री गजानन आडे साहेब यांनी बेकार्ट मुकुंद वायर इंडस्ट्रीज प्रा. लि. लोणंदचे दीपक इंगळे प्लांट मॅनेजर गणेश शिंदे मेंटेनन्स मॅनेजर विक्रम कोळपे प्रोडक्शन ऑफिसर अमित लकडे HR ऑफिसर या व फिजिकल कार्पोरेट वेलफेअर प्रा.लि.चे वरुण पाटीदार सर डॉ.सायली शहा मॅडम यांना धन्यवाद दिले. याप्रकारच्या आरोग्य तपासणी अत्याधुनिक साधन सामुग्रीच्या सहाय्याने सर्वसाधारणपणे जपान किंवा अमेरिका या देशात होतात असे वरुण पाटीदार सर यांनी सांगितले. याप्रसंगी अनिश अग्रवाल चेअरमन
स्वप्निल खतेर सचिव
प्रतीक्षा शहा, निखिल पाठोड टॅबलर हे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे स्वागत शाळेच्या वरीष्ठ मुख्याध्यापिका सौ. अरुणा कुरपड यांनी केले. प्रास्ताविक रोहिदास कापसे यांनी केले. केंद्रप्रमुख श्री. शिवाजी साळुंखे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कय्युम मुल्ला लोणंद मुली शाळेच्या मुख्याध्यापिका छाया क्षीरसागर लोणंद मुले नं. १ चे महेंद्र जगताप सर उपस्थित होते. या शिबिरात लोणंद मुले नं. १ व २ व लोणंद मुली शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. कक्ष क्र.१ चे नियोजन कमल बोडरे शोभा परदेशी व रुपाली डोईफोडे कक्ष क्र. २ चे नियोजन शितल निगडे व गजानन नवले कक्ष क्र. ३ चे नियोजन संतोष रणवरे दत्तात्रय काटवटे यांनी केले. मुलांची बैठक व्यवस्था गणेश कांबळे व धनंजय जाधव यांनी केली. तपासणी दरम्यान ज्या मुलांना पुढील उपचाराची गरज आहे किंवा इतर साहित्य देण्याची आवश्यकता आहे त्या सर्व मुलांना बेकार्ट मुकुंद वायर इंडस्ट्रीज लि. लोणंद व फिजिकल कार्पोरेट वेलफेअर प्रा.लि. यांच्यामार्फत मदत करणार असल्याचे प्लॅटचे प्लांट मॅनेजर दीपक इंगळे यांनी सांगितले. कविता नेवसे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


