किकवी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा अशोक काकडे यांनी सांगली जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारला पदभार.


प्रतिनिधी :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

डॉ. राजा दयानिधी यांनी 19 जुलै 2022 रोजी सांगली जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता, उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त पदावरून त्यांची सांगलीला बदली झाली होती, तर आता त्यांची नवी मुंबईला सिडकोचे सह व्यवस्थापकीय म्हणून बदली झाली आहे, तसेच सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून पुणे येथील (सारथी) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी बुधवारी सकाळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडून सांगली जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे डॉ. राजा दयानिधी यांच्या कार्य काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या या दोन्ही निवडणुका शांततेत पार पडल्या, 2024 मध्ये आलेल्या पूर आणि अतिवृष्टीच्या काळात त्यांनी चांगले काम केले आहे, शासकीय दस्तावेज एकत्रित करण्याची राज्यांतील सर्वाधिक चांगली कामगिरी सांगलीत झाली, स्वतः डॉक्टर असल्यामुळे सांगली मिरज रुग्णालयात मूलभूत सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन मधून कोट्यावधी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला, तर नूतन जिल्हाधिकारी म्हणून अशोक काकडे यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेच्या ( सारथी ) व्यवस्थापकीय संचालक म्हणून सध्या कार्यरत होते, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण आयुक्त पुणे, म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे, महाराष्ट्रांच्या राज्यपालांनी त्यांना सेवारत्न पुरस्कारांने सन्मानित केले होते, सांगलीमध्ये त्यांनी सन 2003 ते 2005 मध्ये निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते, त्यामुळे त्यांना सांगली जिल्ह्याचा अनुभव दांडगा आहे, काकडे यांना सांगली जिल्ह्याची माहिती असल्यामुळे विकास कामाला ते चांगलीच गती देऊ शकतात अशी अपेक्षा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीतून व्यक्त केली जात आहे, अशोक काकडे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील किकवी (ता.भोर ) येथील असून ते 2010 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!