प्रियकर बोलत नसल्यांच्या रागांतून मुलीची आत्महत्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रियकराला येरवडा पोलिसांनी केली अटक,


संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. येरवडा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 17 वर्ष 11 महिन्यांच्या एका मुलीने प्रियकर बोलत नसल्याच्या रागांतून राहत्या घरात साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा परिसरांतील वडार वस्ती या ठिकाणी घडला आहे, उन्नती उमेश पेठकर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे, या प्रकरणी तिच्या आत्महत्येसे कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी तरुणावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, केविन चंदेवळ (वय 18) रा. पंचमुखी गणपती मंदिरासमोर वडार वस्ती चित्रा चौक भाजी मार्केट येरवडा पुणे) असे गुन्हा दाखल झालेले आरोपींचे नाव आहे, मयत उन्नती पेठकर आणि आरोपी प्रियकर केविन चंदेवळ हे दोघेही येरवडा परिसरांतील एकमेकांच्या घराजवळ राहण्यास होते, केविन व उन्नती सोबत मैत्रीपूर्ण ओळख निर्माण केली होती, त्यानंतर तिचा प्रियकरांने भुलथापा देवुन तिच्या प्रेमात पडला होता, नंतर तिला मानसिक त्रास देवुन तिच्याशी वादीवाद निर्माण करून बोलणे टाळले होते, मानसिक संतुलन खराब करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, या प्रकरणी मयत मुलीचे भाजपाला विक्री व्यवसाय करणारे वडील उमेश गोरप्पा पेठकर (वय 52) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर पोलिसांनी याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे, अधिक तपास येरवडा पोलीस ठाणेच्या पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) स्वाती खेडकर करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!