प्रश्न फाउंडेशन आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ने झाले १५००० बीज गोळ्यांचे निसर्ग दान.


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभुमी – बजरंग चौधरी

 

मनुष्य झाडे लावू शकतो आदिवास निर्माण करू शकत नाही आदिवास निसर्ग निर्माण करतो म्हणूनच निसर्गातीलच एक संकल्पना पुढे घेऊन प्रश्न फाउंडेशन यांनी २०२३ – २४ या वर्षात पन्नास हजार बीजगोळे संकल्पनेचा प्रकल्प राबवला होता त्यातील १५००० बीजगोळे बिभवी गाव तालुका जावली जिल्हा सातारा येथील माळ रानावर टाकण्यात आले .

सदर कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा ह्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या १०० विद्यार्थ्यांचे योगदान लाभले. प्रश्न फाउंडेशन चे अध्यक्ष सूरज बीडगर ह्यांनी एका महिन्या पूर्वी बिभवी गावातील माळरानांची पाहणी करून काही बिजगोळे आपण इथे टाकू अशी इच्छा दर्शवली होती त्या पार्श्वभूमी वर प्रश्न फाउंडेशन चे सचिव अभिषेक सावंत आणि साताऱ्याचे कार्याध्यक्ष रजत नवले ह्यांनी आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग ह्यांच्या सोबत मिळून तब्बल १५००० बीज गोळ्यांचे निसर्ग दान केले.

ADVERTISEMENT

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक गिरी आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिट चे कार्यक्रम अधिकारी संजय धोंडे ह्यांनी प्रश्न फाउंडेशन च्या अभिनव अशा सामाजिक उपक्रमाला खूप शुभेच्छा दिल्या.

सदर उपक्रमात भाग घेतलेल्यांपैकी एक विद्यार्थी गोविंद शिंदे म्हणतो की ” माझ्या साठी हा उपक्रम नवीन होता. कार्यक्रमात सहभागी होऊन छान वाटलं. येत्या वर्षात आम्ही देखील आमच्या महाविद्यालयात स्वतः बीज गोळे बनवून वेगवेगळ्या माळरानावर टाकू .

सदर उपक्रम हा महाराष्ट्रातील विविध भागात प्रश्न फाउंडेशन मार्फत राबवला जात आहे तरी ह्या उपक्रमाला जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमींनी हातभार लावावा अशी विनंती प्रश्न फाउंडेशन चे सचिव अभिषेक सावंत ह्यांनी आपल्या वर्तमान पत्रा मार्फत केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!