भोर एमआयडीसीसाठी शिवसेनेचा पाठपुरावा!उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक; गणेश निगडे यांच्या सातत्याने पाठपुराव्याला यशाची चाहूल


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

दि. 25 भोर (प्रतिनिधी) –भोर तालुक्यातील औद्योगिक विकासाची नांदी ठरणाऱ्या प्रस्तावित भोर एमआयडीसी प्रकल्पासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असून, लवकरच ठोस निर्णय घेतले जातील, अशी स्पष्ट ग्वाही उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे.

 

ही बैठक दिनांक २३ जुलै २०२५ रोजी मंत्रालयातील उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात पार पडली.

या बैठकीचा पुढाकार शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश शरदराव निगडे यांनी घेतला होता.

विशेष म्हणजे, या बैठकीसाठी मंत्रालय प्रवेशासाठी अधिकृत परवानाही श्री. निगडे यांना देण्यात आली, यासंदर्भातील शासनाचे अधिकृत पत्रही प्राप्त झाले आहे.

 

गणेश निगडे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा:

 

“भोर तालुक्यामध्ये एमआयडीसी व्हावी म्हणून, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख पद आल्यापासून सातत्याने प्रयत्न करतोय,”

ते गेले अनेक महिने मंत्र्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत भोर एमआयडीसीच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

त्यांच्या मते, भोर तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, आर्थिक विकासाला चालना मिळावी आणि भोरचा औद्योगिक चेहरा उजळावा, हाच यामागचा मुख्य हेतू आहे.

ADVERTISEMENT

 

बैठकीत काय झाले?

 

या बैठकीत निगडे यांनी एमआयडीसी प्रकल्पाचा संपूर्ण सविस्तर प्रस्ताव मांडला त्यामध्ये –

 

भोर तालुक्यातील उपलब्ध जमीन,

पायाभूत सुविधा,स्थानिक जनतेचा पाठिंबा,आणि भविष्यातील औद्योगिक संधी यावर भर देत मंत्री सामंत यांचे लक्ष वेधले.

 

 

उद्योगमंत्र्यांची त्वरित दखल:

 

नामदार उदय सामंत यांनी या प्रस्तावाची गंभीर दखल घेतली असून,

संबंधित विभागांकडून तातडीने अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत.यासोबतच लवकरच एक विशेष बैठक बोलावून पुढील नियोजन केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

पुढील पावले:

या बैठकीनंतर गणेश निगडे यांनी भोर प्रांताधिकारी (RRO) यांच्या दालनातही पुढील भेटीची वेळ निश्चित केली आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक संवादाला गती मिळणार आहे.

 

शेवटी गणेश निगडे यांचे हे प्रयत्न भोर तालुक्यातील उद्योगीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते.

या प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगार, शिक्षण, व्यवसाय व आर्थिक स्थैर्याचे नवे दरवाजे उघडणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!