आपले शरीर तंदुरुस्त बनवायचं असेल निरोगी ठेवायचे असेल तर सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही – सचिन नेवसे आत्मा बी.टी.एम.जावली
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मामुर्डी : महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सातारा व तालुका कृषि अधिकारी जावली यांच्या वतीने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजना २०२४ – २५ मधील समाविष्ट शेतकरी गट गावपातळीवरील शेतकरी प्रशिक्षण वर्ष १ले दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर मामुर्डी ता. जावली जि. सातारा येथे आयोजित करण्यात आले होते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अजय पवार कृषी पर्यवेक्षक मेढा-१ यांनी केले.
श्री सचिन नेवसे, बी टी एम जावली यांनी गट स्थापना, नैसर्गिक शेती चे महत्त्व या बाबत मार्गदर्शन केले व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेबाबत सखोल मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक, मेढा -१ श्री.अजय पवार , कृषि सहाय्यक मेढा- श्री. विलास कदम. ,आत्मा BTM श्री. सचिन नेवसे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास कदम कृषी सहाय्यक मेढा व आभार प्रदर्शन श्री. बजरंग चौधरी माजी सरपंच मामुर्डी यांनी केले.


