नायलॉन मांजा अखेर पोलिसांच्याच गळ्यावर :- छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पीएसआयचा गळा कापला, प्रकृती चिंताजनक…!


पुण्यभूमी उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी

कर्तव्यावरून निघालेल्या पीएसआय चा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला आहे, बीड बायपास परिसरांतील सुधाकरनगर मध्ये सकाळी दहा वाजता घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून जखमी दिपक पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत.‌ मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावरून आपल्या दुचाकीवरून निघाले होते, सुधाकरनगर मधून जात असताना अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला स्थानिकांनी धाव घेत त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात होणार आहेत उपचारांसाठी दाखल केले आहे, ही घटना अत्यंत इतकी गंभीर होती की पीएसआय दिपक पारधे यांच्या गळ्याला मांजा लागतात रक्ताच्या धारा निघाल्या, त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः नायलॉन मांजा रुतला होता. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली, 31 गुन्हे तरीही मांजा सुसाट शहर पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांमध्ये 31 गुन्हे दाखल करीत 400 पेक्षा अधिक रील जप्त केल्या आहेत. मात्र तरीही शहरांत सोशल मीडियावर ऑनलाईन वेबसाईट वरून नायलॉन मांजा खरेदी करण्यात येत आहेत. या बेजबाबदार नागरिकांमुळे जवळपास 40 पेक्षा अधिक नागरिक आत्तापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!