राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पाटण तालुका मुंबई कोर कमिटीच्या अध्यक्षपदी अमर पवार तसेच पोपटराव कदम यांची मुंबई संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली
प्रतिनिधी: शंकर माने
मुंबई पाटण तालुक्याचे भाग्यविधाते माझी मंत्री आदरणिय श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर दादा यांच्या आशीर्वादाने आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक पाटण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा यांच्या संकलपणेतून आणि मार्गदर्शना खाली रविवार दिनांक 4/8/2024 रोजी मुंबई मधील प्रमुख कार्यकर्त्यांची कोअर कमिटी मध्ये निवड कऱण्यात आली आणि या निवडी मधून दादांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी ओळख असलेले तरुण तडफदार कार्यकर्ते श्री.अमर राजेंद्र पवार साहेब यांची सर्वानुमते एकमुखाने बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पाटण तालुका मुंबई च्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आणि तसेच मुंबई मधील उद्योजक श्री.पोपटराव कदम नाना यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पाटण तालुका मुंबई संपर्क पदी निवड करण्यात आली.
तसेच
याप्रसंगी मा. श्री. सत्यजितसिंह पाटणकर दादा उपस्थित होते ,त्याच बरोबर कोअर कमिटीचे सगळे सदस्य आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, या सर्वांनी नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.


