लोणंद पोस्ट ऑफिस मध्ये सणासुदीच्या काळामध्ये पाकिटांचा तुटवडा वरिष्ठ दखल घेतील काय?
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद शहरातील पोस्ट ऑफिस पंचक्रोशीतील दळणवळणाचे साधन आहे आगामी नाग पंचमी रक्षाबंधन काळामध्ये राखी पाठवण्याचे पवित्र सणाचे महत्त्व साजरे होणार आहे अशा परिस्थितीमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये पाकिटांचा तुटवडा सातत्याने भेडसावत आहे त्यामुळे ग्रामस्थासह पंचक्रोशीतील कुटुंबे नाराज आहेत रक्षाबंधनानिमित्त पवित्र सणाची राख्या महाराष्ट्रामध्ये पाठवण्याचे कामकाज सुरू असते आणि तुटवड्यामुळे सर्व व्यवस्था कोलमडली जाते पाकिटे पाठवण्यासाठी खाजगी दुकानात जाऊन खरेदी करण्यासाठी पायपीट करावी लागते हे केवळ गलथान कारभार येथील पोस्ट ऑफिस मध्ये चालू आहे प्रत्येक वर्षी रक्षाबंधनला पाकिटाचा तुटवडा ही केवळ हास्यपद गोष्ट आहे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन पाकिटांचा तुटवडा दूर करून पाकिटे पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करावेत अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत


