खेड शिवापूर येथील शिवभूमी ज्युनिअर कॉलेजमध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान! राजगड पोलीस स्टेशनतर्फे कायदेविषयक मार्गदर्शन


मंगेश पवार

खेड शिवापूर – राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे खेड शिवापूर येथील शिवभूमी ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध गंभीर गुन्ह्यांविषयी तसेच कायद्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

 

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर क्राईम, पोक्सो कायदा, निर्भया पथकाची कार्यप्रणाली, डायल 112 या आपत्कालीन सेवेबाबत माहिती, तसेच अँटी रॅगिंग कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांनी चुकीच्या गोष्टींना बळी न पडता कायद्याचे पालन करावे, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर राहावे, असे आवाहन केले.

ADVERTISEMENT

 

या उपक्रमात मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शंका-निरसन सत्राद्वारे विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले, त्यांची पोलीस अधिकारीांनी समर्पक उत्तरे दिली.

 

कार्यक्रमाचे आयोजन राजगड पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले. मपोहवा प्रमिला निकम यांनी या जनजागृतीचे मार्गदर्शन केले. राजगड पोलीस स्टेशन  प्रभारी अधिकारी राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली  हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!