वेळू फाटा येथे मध्यरात्री टेम्पोखाली चिरडून तरुणाचा मृत्यू – पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा


भोर तालुका (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील वेळू फाटा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या धक्कादायक घटनेत अविनाश देवदास सातपुते (रा. कात्रज) या तरुणाचा टेम्पोखाली चिरडून मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, श्रीमती कलावती संतोष सातपुते (वय 36, मूळ रा. उत्तर सोलापूर, सध्या रा. कात्रज, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2.30 ते 2.40 वाजण्याच्या सुमारास वेळू फाटा येथे मुलगा अविनाश सातपुते व त्याचे मित्र प्रदीप मुजमुले, शंभू अडागळे, हर्षद घुगे, सुमित राठोड व ऋषी जाधव उभे असताना आरोपींनी रस्त्यावर गर्दी जमवून हल्ला केला.

 

1. समीर मोहम्मद शेख (वय 22, रा. वेळू, ता. भोर)

2. अनिकेत बाळू शिंदे (वय 24, रा. वेळू, ता. भोर)

3. सुरज विलास पवार (वय 28, रा. वरखे, ता. भोर)

4. तनवीर तानाजी पांगारे (वय 18, रा. वेळू, ता. भोर)

ADVERTISEMENT

5. दिगंबर उर्फ साहिल अनिल पांगारे (वय 25, रा. वेळू, ता. भोर)

मुलगा अविनाश याचा मित्र प्रदीप मुजमुले व आरोपी समीर शेख याचा भाऊ अमिन शेख यांच्यातील जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोपींनी बाहेरून मित्र बोलावून वेळू फाटा येथे तरुणांना थांबवले. आरोपी समीर शेख (आरोपी क्र.1) याने त्याच्या ताब्यातील बस (MH 12 YB 8513) फिर्यादीच्या मुलगा अविनाश व त्याचे मित्र प्रदीप मुजमुले, हर्षद घुगे व ऋषी जाधव यांच्या अंगावर चालवून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने आरोपींनी पुन्हा टेम्पो (MH 12 PF 2153) अंगावर घालून अविनाश सातपुते याला गाडीखाली चिरडून ठार मारले. त्याच वेळी त्याच्या मित्रांनाही जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पुढील तपास प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राठोड करीत आहेत.

या घटनेनंतर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!