मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ यांचे आवाहन.
पुणे : धर्मेंद्र वर्पे.
मराठा समाजातील तरुणांनी चांगली प्रगती करायची असेल तर स्वतः च्या मनातील न्यूनगंड काढून टाकला पाहिजे असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पद्मावती येथील आण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित केलेल्या आजचा निश्चय,पुढचं पाऊल या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.अडसूळ यांच्या हस्ते झाले, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उपस्थित मान्यवरांच्या खिळवून ठेवणाऱ्या मुलाखती भाषणकला प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व मगरपट्टा टाऊनशिप डेव्हलपर, अँड कन्स्ट्र लिमिटेड या कपंनीचे प्रमुख सतीश मगर,कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, के एज्युकेशनल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव जाधव, बांधकाम व्यावसायिक अरुण निम्हणं, माजी नगरसेवक शाम मानकर, हॉटेल व्यावसायिक जवाहर चोरगे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी व्यवसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल बांधकाम व्यावसायिक अरुण निम्हणं, हॉटेल दुर्वांकुर चे शामराव मानकर व निसर्ग व हॉटेल एसपीज बिर्याणी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक जवाहर चोरगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ.अडसूळ आपल्या भाषणात म्हणाले कि मराठी तरुणां ना स्वतः ला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो एम पी सी व यू पी एस सी परीक्षा देताना त्यांनी इतर क्षेत्रातही प्रयत्न करावेत शिक्षणबरोबरच नवीन तंत्रज्ञानही आत्म सात करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना सतीश मगर म्हणाले कि, तरुणांनी प्रगती करताना शिका संघटित हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन शिस्त अंगी बाळगावी असे आवाहन केले.
इतिहास संशोधक सावंत म्हणाले कि तरुणांनी मोडी लिपी शिकण्याची आवश्यकता आहे त्यामुळे इतिहासतीलअनेक गोष्टी उजेडात येतील,तर यादवराव म्हणाले पर्यटन क्षेत्र विकसित केले तर तरुणांना चांगला रोजगार मिळेल.
राजेंद्र कोंढरे यांनी प्रस्तविकपर भाषणात मराठी समाजा मध्ये साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली असल्याचे सांगितले.
अभिषेक मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले युवराज दिसलें यांनी उपस्थिताचे आभार मानले.

