सिंहगड अँकँडमीत स्वातंत्र्यदिन साजरा
एस.एन.नांदेडकर
पुणे / प्रतिनिधी भारताचा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहाने साजरा होत असताना शहरातील पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण केंद्र सिंहगड रोड परिसरातील हिंगणे आनंदनगर येथील सिंहगड अँकँडमीत स्वातंत्र्य दिन शैक्षणिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी पहिले सत्र प्रथमत: ध्वजारोहण व राष्ट्रगीत जन-गण-मनने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थित मान्यवर संचालक शैलेश सर, पल्लवी मॅडम, नांदेडकर सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या मनोगतानंतर दुसरे सत्र विद्यार्थ्यांचे मनोगत, भाषण, देशभक्तीपर गीत – गायन, प्रश्नमंजुषा, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
तद्नंतर सहभागी विद्यार्थ्यी विद्यार्थींनी साक्षी सुर्वेसे, वैष्णवी मंजुळे, अक्षदा शिंदे, प्रांजल कुदांडे, महेक शेख, रिया म्हस्के, ऐश्वर्या गायकवाड, रोशनी तकीक,सुष्मा महाल,मंजुषा महाजन,स्नेहा वाघमारे, ऋतुजा रेडेकर, अश्विनी जाधव, साक्षी भोंग,कोमल कचरे,मोनाली लोंढे यासह अक्षय मोरे, गौरव भारती,मयुर शिंदे, समीर शेख, अभिषेक आलुरे, जनार्धन आग्रे, अभिषेक आगवन, प्रतिक गाडेकर,अंबाजी कानडे,चंद्रकांत कनगले,राज तौर, वैभव फिरंगे,ओमकार खरात, विश्वजित शिंदे, विनायक सुर्यवंशी, माधव ठोंबरे, विशाल खंदारे, यश गायकवाड आदिंनी उत्कृष्टपणे सहभाग नोंदवला तर श्रध्दा विभूते, ऋतुजा जाधव,समिक्षा गावडे,तनवीर पटवेकरी, यश जाधव आदि उपस्थित होते तिस-या सत्राचा व कार्यक्रमाचा समारोप अल्पोहाराने करण्यात आला.


