जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज काढून लाखो रुपयांची फसवणूक! फसवणूक झालेले शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
कुडाळ : तालुका जावली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील तत्कालीन शाखाप्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाढवे तसेच एजंट मंगेश भरत निकम यांनी संगणमत करून, जावली तालुक्यातील सुमारे सात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून २२ लाख रुपयांची फसवणूक केली, जून २०१८ मध्ये या फसवणुकीची शेतकऱ्यांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. आता फसवणुकीचा आकडा वाढला असून आणखी वाढण्याची शक्यता आहे, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पीक कर्ज काढून देतो असे सांगून शेतकऱ्यांचे जमिनीचे उतारे व कागदपत्रे घेऊन तत्कालीन बँकेचा शाखाप्रमुख मनोज लोखंडे बँकेतील शिपाई गाढवे आणि एजंट मंगेश भरत निकम, यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून, कर्ज प्रकरणावर शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन शेतकऱ्यांची प्रत्येकी तीन लाख रुपये प्रमाणे या तिघांनी फसवणूक केली आहे, शेतकऱ्यांच्या नावावर कागदपत्रांचा गैरवापर करून तत्कालीन बँक ऑफ महाराष्ट्राचा शाखाप्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाढवे तसेच एजंट मंगेश भरत निकम यांनी शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जून २०१८ मद्ये मेढा पोलीस ठाण्यात तत्कालीन बँक मॅनेजर मनोज लोखंडे सह दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावेळी जावळीत एकच खळबळ माजली होती, गेल्या सहा वर्षापासून फसवणूक झालेले शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनेची दाहकता लक्षात घेता घटनेमध्ये सातत्यता आढळून आल्यानंतर बँकेमध्ये घोटाळा केलेल्या अधिकाऱ्याला कोणतीही संधी न देता अटक करण्याची मोहीम पोलिसांकडून आखण्यात आली होती मात्र तत्कालीन बँक मॅनेजर ऐवजी शिपाई व एजंट हाताशी लागला व मनोज लोखंडे फरार झाला. दरम्यान बँक मॅनेजर मनोज लोखंडेला वाचवण्यासाठी सातारा येथील वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनीही मोठी फील्डिंग लावली होती, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तत्कालीन बँक मॅनेजर लोखंडे यांनी मोठ्या चालाखीने कागदोपत्री कुठेही अडचणीत येणार नसल्याची काळजी घेतली असली तरी, शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणी एजंटचा या प्रकरणातील सहभाग खात्यावर जमा होणारी रकमेची अफरातफर यामध्ये भानगडी असल्याचे स्पष्ट झालेले आहे, काही वेळासाठी शेतकऱ्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यामध्ये पैसे जमा झाले होते व लगेचच संबंधित एजंटच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर झाले होते, त्यामुळे तो मी नव्हेच म्हणणारा लाखोबा लोखंडे सारखा माणूस मनोज लोखंडे मेढा पोलिसांच्या ताब्यात कधी येणार असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. सदर प्रकरणात एजंट मंगेश भरत निकम फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना तुमचे पैसे मी वापरले असून लवकरच ते बँकेत भरणार असून तुम्ही निश्चिंत रहा असे वारंवार सांगत असतो, पैसे कधी भरणार आहेस अशी विचारणा करण्यास काही शेतकरी त्याच्या घरी गेले होते, त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी शेतकऱ्यांना अनेकदा शिवीगाळ करत धमक्या दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी असेच शेतकरी मंगेश भरत निकम याचे घरी गेले असता त्याचा भाऊ गणेश भरत निकम याने संबंधित शेतकऱ्याच्या बायकोला जीवे मारण्यासह अर्वाच्य भाषेत त्याच्याच मोबाईलवरून शिवीगाळ केली, त्याची कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असून संबंधित गुन्ह्याची नोंदही मेढा पोलिसांकडे करण्यात आली आहे, परंतु मेढा पोलिसांकडून अजूनही त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असणारे शेतकरी न्याय मागायचा तरी कोणाकडे अशी विचारणा येथील प्रशासनाकडे करत आहेत. चालू घडीला फसवणूक झालेले शेतकरी प्रशासनाकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, संबंधित बँक एजंट मंगेश भरत निकम याच्यावर फसवणुकीसह जावली तालुक्यात अवैद्य दारू विक्री साठी अनेक गुन्हेही दाखल आहेत सध्या त्याला पोलिसांकडून जावली तालुक्यातून तडीपार करण्यात आलेले आहे.