पांडे गावातील “एल अँड टी” कंपनीच्या परिसरात बिबट्याचा वावर ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.


 

 

दि. ६ सारोळे:  भोर तालुक्यातील पांडे गावातील “एल अँड” टी” कंपनीच्या परिसरात शुक्रवारी दि. ६ सप्टेंबर रोजी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

१५ दिवसांपूर्वी पाचलिंगे गावातील शिवारात बिबट्याने वासरू ठार केले होते. एल अँड टी कंपनीच्या भागात गावातील शेतकऱ्यांना बिबट्या दिसला आहे.” एल अँड टी “कंपनीच्या बाजूस कंपनीच्या पायपावरती गावातील बाळू यादव या शेतकऱ्यांने मोबाईल कॅमेऱ्यात बिबट्याचा वावर होत असल्याचे फोटो काढले आहेत.

ADVERTISEMENT

बाळू यादव गुरे चारायला शेतात गेले असता त्यांना बिबट्या दिसताच पांडे गावातील चेअरमन महेश साळुंके यांना दूरध्वनी द्वारे कळवले.

दरम्यान पांडे गावातील सरपंच तेजस साळुंखे यांनी गावातील नागरिकांना सांगितले आहे की, पांडेगावामध्ये असलेल्या” एल अँड टी” कंपनीच्या आवारात बिबट्या आढळून आल्याचे निदर्शनात आले असल्याने त्या कंपनीच्या परिसरात ज्या शेतकऱ्यांची शेती आहे त्यांनी त्या आवारामध्ये जाण्याचे उद्या टाळावे. बिबट्या आढळाची माहिती वन विभाग यांना कळवली आहे. वन विभाग यांची उद्या तपासणी होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी वनविभाग यांचा पाठपुरावा होईपर्यंत त्या परिसरात जाण्याचे टाळावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!