पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची कॅटमध्ये धाव :- पुढील सुनावणी पर्यंत बदलीला स्थगिती दिली.
संपादक : संभाजी पुरीगोसावी
केवळ सात महिन्यांच्या आत बदली केल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या बदली विरोधांत तातडीने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण ( कॅट ) धाव घेतली आहे, देशमुख यांच्या अर्जाची तातडीने सुनावणी होऊन न्यायाधिकरणचे सदस्य जस्टीस एम.जी सेवलीकर आणि संतोष मेहरा यांनी या बदलीला अखेर स्थगिती दिली आहे, पंकज देशमुख यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागातून 31 जानेवारी 2024 रोजी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली होती, त्यानंतर केवळ ७ महिन्यांमध्ये त्यांची मुंबईचे पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती, मध्यावती काळात बदली करताना त्यामागे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, त्यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुढील सुनावणी पर्यंत बदली करू नये असा आदेश न्यायाधिकरणाने दिला आहे, या दाव्याची पुढील सुनावणी 19 ऑक्टोबर 2024 रोजी ठेविण्यात आली आहे, आयटी अभियंता असलेले पंकज देशमुख हे महाराष्ट्र केंडरचे 2011 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत, पंकज देशमुख यांनी अमरावती ग्रामीणमधून आपल्या पोलिस सेवेला सुरुवात केली, त्यानंतर नांदेड अहमदनगर उस्मानाबाद सातारा येथे त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे, पुणे शहरांत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तसेच परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले आहे, पंकज देशमुख हे एक शिस्तप्रिय आणि डॅशिंग आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची महाराष्ट्र पोलीस खात्यात ओळख आहे.