शिवरे गावच्या हद्दीत कंटेनर ट्रक आणि इनोव्हा गाडीचा अपघात! सुदैवाने जीवितहानी नाही.
मंगेश पवार
नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावचे हद्दीत कंटेनर आणि इनोव्हा गाडीमध्ये भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात दोघे जखमी होऊन जीवित हानी झाली नाही.
याबाबत सचिन सूर्यकांत पुंडे वय ४४ वर्ष रा. श्रीवल्लभ प्लॉट नंबर २१ पनवेल यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि.१/६/२४ रोजी दुपारी ३:३० वा दरम्यान शिवरे ता.भोर जि.पुणे गावच्या हद्दीत युनिव्हर्सल कंपनी समोर सचिन पुंडे हे आपल्या टोयोटा इनोवा क्रिस्टा गाडी नंबर एम एच ०१ डीएक्स ९१४९ मधून पुणे येथे जात असताना कंटेनर ट्रक नंबर एन एल ०१ ए जी ५८१० वरील चालक साहूने सायरा खां वय ४५ रा. मानकपूर ता.अदोली जि. अलवर राज्य राजस्थान याने पुणे ते सातारा जाणाऱ्या लेन वरील कंटेनर ट्रक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून डिव्हायडर तोडून सातारा ते पुणे लेनवर येऊन अपघात केला. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामध्ये ईनोवा गाडीतील पुंडे यांचा मुलगा कौस्तुभ पुंडे वय ११ वर्ष यांच्या उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाले असून त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.
या अपघातामध्ये इनोवा क्रिस्टा या गाडीचे जास्त नुकसान केले आहे. म्हणून याबाबत सचिन पुंडे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


