चलाडी फाटा, नसरापूर येथील ऐतिहासिक स्तंभाच्या रक्षणासाठी शिवभक्तांचे शांततामय उपोषण


मुख्य संपादक मंगेश पवार

कार्यकारी संपादक सागर खुडे

भोर तालुक्यातील चलाडी फाटा, नसरापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाशी संबंधित एक इतिहासकालीन स्तंभ आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. या स्तंभाभोवती अतिक्रमण झाले असून, परिसरात अस्वच्छतेचे व बेफिकिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा स्तंभ हा केवळ एक दगड नसून, तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि इतिहासाचा साक्षीदार आहे.

 

संबंधित प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली गेली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे संतप्त शिवभक्तांनी दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता, या स्मारकस्थळी शांततामय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला वीर धाराऊ माता यांचे वंशज  स्वप्नील गाडे व अमित गाडे यांची उपस्थिती लाभणार आहे.

ADVERTISEMENT

 

या आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करण्यात येत आहेत:

 

अतिक्रमण तत्काळ हटवावे

 

परिसराची साफसफाई करून सुशोभीकरण करावे

 

इतिहासकालीन स्तंभाचा जतन व संवर्धन करण्यात यावे

 

 

या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे शिवभक्तांचे मत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी, अन्यथा पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष अजय कांबळे यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!