जि.प.शाळा किकवी येथे विविध उपक्रम साजरे.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किकवी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास होण्यासाठी विविध उपक्रम उत्साहात साजरे केले जातात.त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक अशा राख्या स्वतः तयार केल्या व शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केले.त्याराख्या मुलींनी मुलांना बांधून रक्षाबंधन हा उपक्रम साजरा केला .
तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडी व केळी यांचे वाटप केले जाते .
सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले .शाळा स्तरावर सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली -त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.स्काऊट गाईड अंतर्गत कब बुलबुल विद्यार्थ्यांचे गट स्थापन करण्यात आले व त्या अंतर्गत कब बुलबुल चे विविध उपक्रम विविध खेळ शनिवारी घेतले जातात तसेच आनंददायी शनिवार उपक्रमाचीअंमलबजावणी केली जाते. शाळा स्तरावर मुलांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी तक्रार पेटी बसवण्यात आली.या सर्व उपक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून भोर तालुक्याचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी साहेब राजकुमार बामणे तसेच विस्तार अधिकारी गुंड व सारोळा केंद्राचे केंद्रप्रमुख विजयकुमार थोपटे यांचे मार्गदर्शन मिळाले .तसेच जि प प्राथमीक शाळा किकवीचे मुख्याध्यापक शशिकांत गुरव व सहशिक्षिका नम्रता घोगरे व स्वाती तरटे यांनी उस्फूर्तपणे उपक्रम साजरे केले.


