कोतवाली पोलीस ठाणेचे नवे कारभारी म्हणून संभाजी गायकवाड यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून थेट नियुक्ती,
संभाजी पुरीगोसावी (अहिल्यानगर जिल्हा) प्रतिनिधी. अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे पोलीस स्टेशन म्हणून गणले जाणारे कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून. याबाबत आज जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी थेट आदेश काढला आहे. मागील दोन दिवसांपूर्वी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचारांचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांची पोलिस अधीक्षकांनी तात्काळ नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्याचा पदभार कोण स्वीकारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नगर जिल्ह्यात जामखेड आणि पारनेर पोलीस ठाण्यात काम पाहिल्यामुळे त्यांना या जिल्ह्याचा अभ्यास चांगला आहे. पारनेर वरून त्यांची पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर पुन्हा ते अहिल्यानगर जिल्ह्यात बदली होऊन आले होते. काही दिवसांपासून ते नियंत्रण कक्षात होते. आता नव्याने त्यांची नियुक्ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.