नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची बदली; जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीने नंदुरबार जिल्हा भावनिक…!
संपादक : संभाजी पुरीगोसावी
नंदुरबार : येथील जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे, तर त्यांच्या जागेवर नंदुरबारला नव्याने डॉ. मिताली सेठी या नव्या जिल्हाधिकारी असणार आहेत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन वर्ष जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट सेवा दिली, दोनच दिवसांपूर्वी राज्य शासनांने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले यात प्रामुख्यांने सलग तीन वर्ष आणि उत्कृंष्ट सेवा देणारे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली, आयएएस अधिकारी मनीषा खत्री यांनी बीए एलएलबी शिक्षण पूर्ण केले असून, त्या हरियाणातील सोनपत गावच्या आहेत, सन 2014 तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत, त्यांनी आत्तापर्यंत अप्पर आयुक्त आदिवासी आयुक्तालय नागपूर मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि उपविभागीय अधिकारी पाचोरा या विविध पदावर अशा विविध पदावर त्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली आहे, सध्या नंदुरबार जिल्ह्यातही सलग तीन वर्षे नंदुरबारकरांना उत्कृंष्ट सेवा देत जिल्ह्यात विविध उपक्रम आणि जिल्ह्याचा विकास देखील चांगलाच केला होता, त्यांच्या बदलीने नंदुरबार जिल्हा देखील भावनिक झाला आहे.


