शिव प्रहार प्रतिष्ठान तर्फे माळवाडी ते मळे-भुतोंडे यापैकी कोणत्याही फाट्यावर शिव प्रहार प्रतिष्ठाणच्या वतीने आदोलन करण्यात येणार होते ते आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित.


कार्यकारी संपादक :सागर खुडे

भोर : माळवाडी ते मळे-भुतोंडे रस्त्यावरील खड्डे जी. एस. बी. व ईमरशेल बुजवण्यात यावेत यासाठी शिव प्रहार प्रतिष्ठान ने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता ते आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भोर यांनी आज दिनांक २६/०८/२०२४ शिव प्रहार प्रतिष्ठान यांना त्या संदर्भात लेखी पत्र देण्यात आले व सांगण्यात आले की,वस्तुतः दिनांक २२ जुलै पासून प्रचंड पाऊस असलेने खड़े भरणेचे काम शक्य झाले नव्हते तथापी पावसाचे प्रमाण कमी झाल्यास सदर रस्त्यावरील जी. एस. बी. ने भरुन घेण्यात येत आहे तरी आपण मागणी केले नुसार खड्डे बुजविण्याचे काम हे माहे सप्टेंबरचे पहिल्या आठवड्यात दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी विनाविलंब करणेत येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, भोर यांच्याकडुन देण्यात आले.

ADVERTISEMENT

आज दिनांक २६ ऑगस्ट २०२४ रोजी चे लेखी आश्वासनानंतर सदरचे आदोलन स्थगित करण्यात येत आहे परंतु खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण न केल्यास भविष्यात अति तीव्र आंदोलन केले जाईल याची नोंद घ्यावी असे शिव प्रहार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते आणि कार्यकर्ते यांनी सोशल मीडिया शी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!