मॅग्ना ऑटोमोटिव्ह इंडिया कंपनीच्या “सि एस आर”फंडातून “न्हावी शाळेला”अत्याधुनिक शौचालय बांधकामाचा उदघाटन समारंभ संपन्न.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
सारोळे : स्वच्छता सुविधांच्या विकासाद्वारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे यासाठी जिल्हा परिषद प्राथ. शाळा, न्हावी, ता.भोर, जि.पुणे.शाळेत शुक्रवार दि.४ मॅग्ना ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड(MAGNA)
या कंपनीच्या सि एस आर ऍक्टिव्हिटीतून आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज(IAHV) या संस्थेच्या अंमलबजावणीतून जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेला अत्याधुनिक शौचालय बांधकामाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला.यावेळी मॅग्ना कंपनीचे अभय दांडेकर(सी.एस.आर. प्रमुख),अतुल गुजर, रुपक कर्वे,श्रीकांत भोसले,जनार्दन सानप,शुभम दीक्षित,सुप्रिया पाटील (आय.ए.एच.व्ही. संचालिका),दत्ताजी सर, सचिन सोनवणे,शरद सोनवणे,दिपक सोनवणे, गणेश सोनवणे,पूनम सोनवणे,सोनाली बोन्द्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आलेल्या मान्यवरांचे विद्यार्थी लेझीम पथकाने स्वागत केले.पाहुण्यांचे औक्षण करण्यात आले.वरदराज सोनवणे व सिद्धी सोनवणे या दोन चिमुकल्यांनी कंपनी व संस्थेचे आभार मानले.संपूर्ण शौचालयाच्या बाजूने वेगवेगळ्या गुलाब वृक्षांचे वृक्षारोपण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या मनोगतातून सर्वांनीच विध्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी,आरोग्यपूर्ण शिक्षण,शौचालय वापर, पाणी वापर,हात धुणे कृतियुक्त पद्धती यावर बहुमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चाचर यांनी केले, सूत्रसंचालन रुपाली पिसाळ यांनी केले तर आभार संदिप मोरे यांनी मानले.


