स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमास किकवी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद.


 

मुख्य संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

दि.४ऑक्टोंबर २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी मध्ये स्वीप मतदार जागृती अभियानांतर्गत विद्यालयातील विद्यार्थांना स्वीप गीत ऐकवण्यात आले.यावेळी सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी देशभर वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने एक अनोखी मतदार जागृती अभियानाची संकल्पना मांडली असून, त्याअंतर्गत प्रत्येक राज्यात काम सुरु करण्यात आले आहे.पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) असे या योजनेचे नाव आहे.

ADVERTISEMENT

थोडक्यात स्वीप मतदार जनजागृती गीत ऐकून त्याचे निवडणूक प्रक्रियेतील महत्त्व किती आहे हे पटवून देण्यात आले.यामध्ये मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, मतदार यादीतील तपशील दुरुस्त करणे आणि स्थलांतरित आणि मृत कुटुंबातील सदस्यांचे नाव हटविण्यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मतदारांना शिक्षित करण्यासाठी राबवले जातात.तसेच ऑनलाइन, ऑफलाइन सुविधांद्वारे मतदान कसे करावे, निवडणुकीदरम्यान भ्रष्ट प्रथा रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कशी मदत करावी इत्यादींची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर

यावेळी निबंध,रांगोळी,चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. मतदानाचे अशा विविध कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

चित्रकला स्पर्धेत एकूण विद्यार्थी, तर निबंध स्पर्धेत एकूण ६७ विद्यार्थी आणि रांगोळी स्पर्धेत एकूण २५विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

प्रसंगीच्या कार्यक्रमास मुख्याध्यापक विनोद राऊत सर,मोरे सर,संगणकचालक/क्लार्क सागर भिलारे, शिपाई अनिल अहिरे यांसह अन्य शिक्षकवर्ग देखील उपस्थीत होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!