नवी मुंबईत पीआय सतीश कदम चार लाख तर पीआय महेंद्र सावर्डेकरांना दोन लाख लाच घेताना सापडले,लाच लुचपत खात्याने पोलीस अधिकाऱ्यांना घातल्या बेड्या.
संभाजी पुरीगोसावी
लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या ( एसीबी ) मुंबईच्या पथकांने लावलेल्या दोन वेगवेगळ्या सापळ्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच लुचपत खात्याने बेड्या ठोकल्या आहेत. पहिल्या सापळ्यात नवी मुंबईतील एन.आर आय. पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश संभाजी कदम यांना चार लाखांची लाच घेताना सापडले, तर दुसऱ्या कारवाईत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक महेंद्र वासुदेव सावर्डेकरांना देखील गेट पोलीस ठाणेच्या इमारतीत सापळा लावून दोन लाख लाचेची रक्कम देताना स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या कारवाईमुळे नवी मुंबईतील दोन पोलीस अधिकारी जाळ्यात अडकल्याने मुंबईच्या पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. एन.आर.आय पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्यावर अपरात्री कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेपूर्वीच रस्त्यावर ग्रस्त पोलिसांच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले होते, त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचे नक्कीच चालले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहाबाज गावात एक इमारत अचानक कोसळली होती. सदर घटने प्रकरणी एन. आर.आय पोलिसांनी महेश कुंभार याला अटक केली होती. वास्तविक पाहता कुंभार यांनी केवळ विकसित म्हणून गुंतवणूक केली होती. इमारत बांधणारे अन्य कोणी आहेत असा दावा कुंभार यांच्या नातेवाईकांनी केला होता. महेश कुंभार यांना अटक केल्यावर त्यांच्या विरोधात विविध कलमे लावून ते बाहेर येणार नाहीत. त्यांची धिंड शहाबाज गावात काढू अशी धमकी देत 50 लाखाची लाच सतीश कदम यांनी मागितली असा दावा तक्रार कर्त्यांनी केला होता. मात्र अंतिम तडजोड करीत 15 लाख ठरले, यापूर्वी 23 सप्टेंबरला 12 लाख आणि 27 सप्टेंबरला 2 लाख आधींच दिले होते. पडलेल्या इमारतीत एक महिला हेवी डिपॉझिट देऊन राहत होती इमारत पडल्याने महेश कुंभार यांनी तिला तिचे पैसे परत केले होते. ही बाब पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना कळताच तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत सांगत पुन्हा 10 लाखांची लाच मागितली मात्र केवळ चार लाख आहेत असे सांगितल्यावर ते पैसे देण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांनी तक्रार कर्त्याला सांगितले, अशी माहिती तक्रार कर्ता हे लाच लुचपत मुंबई युनिटला भेटले व सर्व हकीगत सांगितली त्याची शहानिशा करून ८ तारखेला सापळा लावून उलवेतील घराबाहेर पैसे स्वीकारताना पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सतीश कदम व पोलीस निरीक्षक महेंद्र सावर्डेकर या दोन पोलीस अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अशी माहिती लाच लुचपत विभागांने दिली आहे.


