पुणे जिल्ह्यातील जवानाला अंबाला येथे वीरमरण, अविनाश भोसले शहीद,
संभाजी पुरीगोसावी
देशसेवा बजावत असताना पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यांतील भोसलेवाडी गावचे सुपुत्र कै. अविनाश हरिश्चंद्र भोसले यांचे अंबाला येथे सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झाल्याची माहिती लष्करी सैनिक विभागांकडून मिळाली आहे, जवान अविनाश हरिश्चंद्र भोसले यांच्या निधनाची बातमी समजताच भोसले कुटुंबासह भोसलेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जवान अविनाश भोसले हे कुटुंबातच नव्हे, तर भोसलेवाडी गावातील ग्रामस्थ व मित्र परिवारांचे लाडके होते. गावातील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये देखील त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांच्या पार्थिंवाची भोसलेवाडी ग्रामस्थांना आतुरता लागून राहिली आहे. जवान अविनाश भोसले यांच्या पश्चांत आई पत्नी एक वर्षाची मुलगी भाऊ भावजय चुलते असा परिवार आहे,