अहंतीची बुद्धिबळात गरुडझेप उद्या नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड .
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यातील जावळीचे मुख्य ठिकाण मेढा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री यांना विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज इयत्ता ९ वी अ ची विद्यार्थीनी व आ. शशिकांत शिंदे महाविद्यालयातील प्राध्यापक संतोष कदम सर यांची कन्या अहंती संतोष कदम हिने सांगली येथे पार पडलेल्या १७ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावला अहंतीची राज्यपातळी वरील स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे राज्य पातळीवरील स्पर्धा नांदेड येथे उद्या बुधवार दिनांक २३ ऑक्टोंबरला होणार आहे अहंती हिचे कॉलेजचे प्राध्यापक पाटील बी बी व मार्गदर्शक शिक्षक तसेच तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .